Thursday, April 25, 2024
Homeनगररेशन दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा कालावधी वाढवा

रेशन दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा कालावधी वाढवा

टिळकनगर|वार्ताहर| Tilknagar

शहरी भागासह ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेशन दुकानदारांचा स्वतःचा अंगठा प्रमाणित करुनच कार्डधारकांना धान्य देण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाकडे निवेेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील काळात सहा ते सात रेशनिंग दुकानदारांचा करोनामुळे मृत्यू झाला. यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदार भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत रेशनिंग दुकानदार आपली दुकाने बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना आधार अधिप्रमाणित करून ई- पास द्वारे धान्य वितरण करण्याचा कालावधी तत्काळ वाढवावा व कोरोना संपेपर्यंत त्याला मुदत वाढ देण्यात यावी.

सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे माहे जुलैपर्यंत शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा दिली होती. परंतु माहे आँगस्ट पासुन कार्डधारकांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे परंतु सध्या करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कार्डधारकांचे अंगठे घेण्याची दुकानदारांना जास्त भिती वाटत आहे.

धान्य घेण्याकरीता दररोज शेकडो ग्राहक दुकानात येत असतात कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशीनवर ठेवावा लागतो त्यामुळे एखादा बाधीत रुग्ण आला तर दुकानदार बाधीत होईलच परंतु त्या नंतर येणारा प्रत्येक व्यक्ती बाधीत होवु शकतो हा धोका लक्षात घेवुन पाँज मशीनवर धान्य दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा देण्यात यावी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत झालेला आहे.

अशा परिसरात दुकान चालू ठेवणे म्हणजे दुकानदारांच्या व सर्व कार्डधारकांच्या जिवाशी खेळण्या सारखे आहे त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करुन धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करुन धान्य देण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या