Friday, April 26, 2024
Homeनाशिकशालेय अभ्यासक्रमावरील ‘टिलीमिली’ उद्यापासून

शालेय अभ्यासक्रमावरील ‘टिलीमिली’ उद्यापासून

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ने पहिली ते चौथी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर “टिलीमिली” या दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. आता पहिले ते चौथीसाठीचा अभ्यासक्रम सोमवारपासून (दि. ८) सुरू होत आहे.

- Advertisement -

राज्यातील महानगरांपासून तर आदिवासी पाड्यांपर्यंत राहणाऱ्या लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी या मालिकेच्या पहिल्या सत्रातील दैनंदिन प्रसारणाचा लाभ जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात घेतला होता.

आता दुसऱ्या सत्रातही या नि:शुल्क सेवेचा लाभ सर्वदूर राहणाऱ्या लक्षावधी ‘टिली व मिली’ अर्थात मुले व मुली त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०२१ पासून रोज घेऊ शकतील. ही मालिका मुलांसोबत पालकांनी व शिक्षकांनीही पहावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या मालिकेत रोज सुचवले जाणारे शैक्षणिक उपक्रम मुले त्याच दिवशी पालकांबरोबर घरी व परिसरात करून त्यातून शिकण्याचा आनंद घेऊ शकतील. “टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते चौथी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील दुसऱ्या सत्राच्या पाठांवर व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे.

पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ (प्रत्येक इयत्तेचे ४८) एपिसोड्स असलेली ही महामालिका रविवार वगळता २४ दिवस रोज प्रसारित केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या