जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं; ‘टायगर ३’ चा अ‍ॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा ‘टायगर 3’ (Tiger 3) दिवाळीत प्रदर्शित होतोय. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टायगरचे चाहते या सिनेमासाठी खूपच आतुर आहेत. सलमानचे मागचे काही चित्रपट दणकून आपटले. मात्र आता, सलमान पुन्हा एकदा ‘टायगर’च्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. सलमानच्या ‘टायगर 3’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘टायगर 3’च्या टीझरमध्ये सलमान खानचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. ‘टायगर 3’ या सिनेमाचा टीझर सिनेनिर्माते यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आहे. ‘टायगर 3’च्या प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे. ‘टायगर 3’ या सिनेमात सलमान खान अविनाश राठोरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण टायगर या नावाने तो ओळखला जातो.

भाजपकडून मिशन लोकसभेची तयारी सुरु; विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर बारीक लक्ष

यात टायगर म्हणतो, ‘माझे नाव अविनाश सिंह राठोर आहे. पण तुम्हा सर्वांसाठी मी आहे टायगर. २० वर्षांपासून त्याने भारत देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. मी त्या बदल्यात काही मागितले नाही पण आज मी मागतोय…आज तुम्हा सर्वांना सांगितले जात आहे की टायगर तुमचा शत्रू आहे. ‘

पुढे तो बोलतो, ‘टायगर हा देशद्रोही आहे. टायगर एक गद्दार आहे, त्यामुळे भारताच्या २० वर्षांच्या सेवेनंतर मी माझे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागत आहे. मी नाही, भारत माझ्या मुलाला सांगेल की त्याचे वडील कोण होते. देशद्रोही किंवा देशभक्त… जर तो जिवंत असेल तर तो पुन्हा तुमच्या सेवेत हजर असेल, नाहीतर जयहिंद…’

टायगरचा मेसेज आता त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचला असून सगळेच उत्सुक आहेत. दिवाळीत सिनेमा प्रदर्शित होतोय. मनीष शर्मा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेय तर ही यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *