Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण प्रणाली बंद

जळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण प्रणाली बंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रेल्वे स्थानकावरील (railway station) तिकीट आरक्षण (Ticket reservation) कार्यालयातील सर्व तिकीट खिडक्या शुक्रवारी दुपारी चार पासून बंद (closed) होत्या. संगणक आरक्षण तिकीट प्रणाली (system) सुमारे चार तास बंद (closed) पडल्याने तिकीट आरक्षण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…गारबर्डी वनजमिनीवरील ८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश

काही प्रवासी तिकीट आरक्षणासाठी दोन ते तिन तास रांगेमध्ये उभे राहून देखील तिकीट आरक्षण करू न शकल्याने संताप व्यक्त करत पून्हा घरी निघून जावे लागले. जळगाव रेल्वे स्थानकावर संगणक तिकीट आरक्षण कार्यालयातील चार तिकीट खिडक्यांवरील संगणक प्रणाली शुक्रवारी दुपारी चार नंतर अचानक बंद पडली. तिकीट आरक्षणासाठी आलेल्या नागरिक सुमारे तीन तास रांगेतच ताटकळत उभे राहावे लागले होते. यात वृध्दांसह, महिलांचा देखील समावेश होता.

करपंल पान, देवा जळलं शिवार!

तिकीट आरक्षण केव्हा सुरू होईल देखील प्रवाश्यांना व्यवस्थित सांगितले जात नसल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. आरक्षण कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून संगणक अपडेट होत असून किती वेळ लागेल हे सांगता येणार नसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या