Saturday, April 27, 2024
Homeजळगावमुलीला पळवून नेण्यार्‍या तरुणाच्या दूकानावर दगडफेक

मुलीला पळवून नेण्यार्‍या तरुणाच्या दूकानावर दगडफेक

अमळनेर Amalner । प्रतिनिधी

शहरातील एका प्रतिष्ठीत व्यापार्‍याच्या (merchant’s) मूलीला (daughter) पळवून घेवून जाणार्‍या तरूणाच्या (youth) दूकानावर संतप्त तरूणांनी दगडफेक (Stone throwing) केल्याने सुभाष चौकात (Subhash Chowk) दंगल सदृष्य परिस्थीती (Riot-like situation) निर्माण झाल्याची घटना आज सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली वेळीच पोलीसांचे (police) पथक पोहचल्याने पूढील अनर्थ टळला या घटनेमूळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

रात्री ऊशिरा पर्यंत शहरातील मूख्य भागात पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता दरम्यान दोन विभिन्न धर्मीय गटात जातीय तणाव निर्माण होवू नये म्हणून ढेकू रोड वरिल पोलीस स्टेशनात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शांतता कमेटी सदस्य व प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक घेवून नागरीकांनी कूठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा हातात घेवू नये असे अवाहन पोलीस प्रशासनाच्या वतिने पो नि जयपाल हिरे यांनी केले आहे.

सदर तरूणीला पळवून नेल्याने संतप्त जमावाने व काही समाज कंटकांनी शहरातील फळविक्रेते व नारळ विक्रेत्यांना लक्ष करित मंगलमूर्ती चौक व लालबाग शॉपींग तसेच पोस्टाजवळील विक्रेत्यांचे नूकसान केले यामूळे शहरात दंगा झाल्याच्या अफवेने काही काळ बाजारपेठ व बस्थानकासह वर्दळीच्या परिसरात तणाव निर्माण होवून पळापळ सूरू होती पोलीसांनी रात्री ऊशिरा पर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता पोलीसात कूठल्याही घटनेचा गून्हा रात्री ऊशिरा पर्यंत दाखल नव्हता चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे डिवायएसपी राकेश जाधव पो नि जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी वेळीच दखल घेत शहरात बंदोबस्त केल्याने अर्धा तासाच्या या घटने नंतर परिस्थीती पूर्वपदावर आली शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान पोलीस स्टेशनात आयोजीत शांतता कमेटीच्या बैठकीला आ अनिल पाटील माजी आ स्मिता वाघ भाजपाच्या अँड ललीता पाटील बाजार समिती प्रशासक सौ तिलोत्तमा पाटील गोपी कासार आजी माजी नगरसेवक प्रतिष्टीत व्यापारी विविध पक्षाचे पदाधिकारींसह यूवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता शहरात सर्वांनी एकोप्याने राहून शांतता ठेवावी शहराच्या शांततेला गालबोट लागणार नाही असे कृत्य कोणीही करू नये आज त्या दोन्ही कूटूंबावर जो आघात निर्माण झाला आहे.

दोन समाजामध्ये दूही निर्माण करून तरूणांचे डोके भडकविण्याचे काम काही समाजकंटक करित आहेत त्याला तरूणांनी बळी पडू नये असे आवाहन केले तर अश्या प्रकारची हि तिसरी घटना असून पालकांनी देखील दक्ष राहावे याचा फायदा काही समाजकंटक घेतात या घटनेला जातीय वळण लागू न देता त्या यूवक यूवतीला शोधण्यासाठी पेलीसांचे पथक तयार केले असून पोलीसांनी त्यांना शोधून हा प्रश्न दोन्ही कूटूंबीयांना बसवून सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करू असा सूर बैठकीत नेत्यांनी व्यक्त केला.

हि बैठक सूमारे दोन तास चालली सदर घटना दि 25 ला घडली या पार्श्वभूमीवर पोलीसांनी दूपारी साडेचार वाजता बैठक घेतली होती त्याची तयारी सूरू असतांनाच शहरात दगडफेकीची घटना घडल्यामूळे शहरातील परिस्थीती शांत करून पोलीसांनी हि बैठक घेतली.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या