Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

जन्मतारखेनुसार भविष्य..

29 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. कल्पनाशक्ती फार चांगली आहे. बौद्धिक क्षमता चांगली आहे. नाविन्य व बदलाची आवड आहे. बौद्धिक कसरत असलेल्या विषयात जास्त रस आहे. या कामाद्वारे विपुल धनप्राप्ती होईल. पण पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्यास उद्योगाचे प्रमुख होऊ शकाल.

- Advertisement -

30 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास तुला आहे. आहे त्या परिस्थितीतून वर येण्याची सतत महत्त्वाकांक्षा राहील. त्यासाठी जीतोड मेहनत कराल. वास्तविक धनप्राप्तीच्या बाबतीत काळजी करावे असे काही नाही. पण चिंता करण्याच्या सवयीमुळे एकाच वेळी अनेक उद्योग करूनही समाधान वाटते.

1 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, समाजाचा प्रमुख नेता बनवले जाईल. जेथे जाल तेथे महत्त्व प्राप्त होईल. बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी संधी मिळेल. या क्षमतेच्या जोरावर वेगळे मार्ग काढून भरपूर पैसा मिळवण्यात यश मिळेल.

2 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. सर्व प्रगती जन्मतः प्राप्त दैवी सामर्थ्याच्या जोरावर होईल. घेतलेल्या निर्णयामधून तुम्हाला चांगले यश मिळेल. पैशांच्या बाबतीत दुसर्‍याला सल्ला घेणे महाग पडेल, स्वनिर्णयाने धनी व्हाल.

3 ऑेक्टोबर – वाढदिवस असलेल्या चंद्र,नेपच्यून,शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. गुरूचा प्रभाव अधिक असल्याने इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धी प्रबळ राहील. ग्रहांची चौकट इतकी प्रबळ आहे की, कोणतेही करिअर असेना यश स्वतःहून तुम्हाला शोधत येईल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळणार असल्याने स्त्री वर्ग व मित्र सहकार्याने श्रीमंत व्हाल.

4 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. हर्शल शनीच्या प्रभावामुळे जीवन इतरांपेक्षा एकदम वेगळे राहील. आपण नियतीच्या हातातील बाहुले आहोत. आपले जीवन आपल्या हातात नाही असे सारखे वाटेल. यालाच दैववाद म्हणतात. आर्थिक प्रगतीसाठी बराच संघर्ष करावा लागेल. उत्तरार्धात मात्र आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

5 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शुक्र, शनी,सूर्यया ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुध, शनी, शुक्र ग्रहाचे एकत्र येणे तुमच्या व्यक्तीमत्वाला पोषक आहे. त्यामुळे व्यक्तीमत्वाला विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कुटुंबातील मंडळी व नातेवाईक यांच्यासाठी वाटे तो त्याग करण्यास सदैव तयार रहाल. कधी कधी त्यामुळे तुमच्या प्रगतीत आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या