Friday, April 26, 2024
Homeनगरगाळपाचा चार लाखांचा टप्पा पार ; खा. विखेच ठरले ‘डॉ.तनपुरे’चे तारणहार

गाळपाचा चार लाखांचा टप्पा पार ; खा. विखेच ठरले ‘डॉ.तनपुरे’चे तारणहार

उंबरे |वार्ताहर| Umbare

प्रारंभी मंदावलेला डॉ.तनपुरे कारखान्याचा गाळप हंगाम आता जलदगतीने सुरू आहे. डॉ.तनपुरे कारखान्याच्या गेल्या अकरा वर्षांच्या गाळपाच्या इतिहासात माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील व तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा 4 लाख 5 हजार टन इतके ‘रेकॉर्डब्रेक’ गाळप झाले आहे. त्यामुळे विखे हेच ‘डॉ.तनपुरे’चे तारणहार ठरले असल्याची प्रतिक्रिया राहुरीतील उसाच्या फडात उमटू लागली आहे.

- Advertisement -

यंदाच्या गाळप हंगामातील माहे फेब्रुवारी 2022 अखेरपयर्ंतचे शेतकर्‍यांचे व ऊस तोडणी मजुरांचेही देणे देऊन त्यांचे खाते विखे यांनी ‘नील’ केले आहे. तर कामगारांचेही देणे कराराप्रमाणे त्यांच्या पदरात पडत असल्याने आता हा कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. डॉ.तनपुरे कारखान्याची चाके आता पुन्हा वेगाने धावू लागल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाच वर्षापूर्वी खा.डॉ. विखे यांनी डॉ.तनपुरे कारखान्याची सत्तासुत्रे हाती घेतली. त्यावेळी हा कारखाना कर्जाच्या विळख्यात सापडलेला होता. कामगारांसह शेतकर्‍यांचेही देणे मोठ्या प्रमाणात थकीत होते. तर आतील मशिनरीही धूळखात पडलेल्या होत्या. मात्र, जादूची कांडी फिरावी, तशी खा. डॉ. विखे यांनी आपल्या कल्पकतेने व राहुरी तालुक्यातील बाजारपेठ आणि शेतकरी-कामगारांचे हित जोपासण्यासाठी डॉ.तनपुरे कारखान्याला चालना दिली. प्रसंगी पदरमोड करून कारखान्याची चाके सुरू केली. अत्यंत खडतर प्रसंगातून त्यांनी हा कारखाना आर्थिकदृष्ट्या रूळावर आणला.

आता यंदा पाचव्या वर्षी कारखान्याने झपाट्याने प्रगती करीत तब्बल 4 लाख 5 हजार टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला आहे. कारखान्यात दैनंदिन 3800 ते 4 हजार टनापयर्ंत गाळप सुरू आहे. साखर पोत्यांचे उत्पादन 4 लाख 55 हजार क्विंटलपयर्ंत जाऊन पोहोचले आहे. तर जिल्ह्यात या कारखान्याच्या सरासरी साखर उतार्‍यात आघाडी घेत सुमारे 11.24 पयर्ंत मजल मारली आहे. तर निव्वळ उतारा 12.20 इतका आहे. त्यामुळे आता या कारखान्याची वाटचाल डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि कामगारांच्या योगदानामुळे प्रगतीकडे पुन्हा झेपावली असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कारखान्याने एकूण 4 लाख 5 हजार टन ऊस गाळप केला असून त्यापैकी डॉ. तनपुरे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 2 लाख 40 हजार टन ऊस गाळप करण्यात आला असून तो एकूण गाळपाच्या 60 टक्के इतका आहे. उर्वरित 1 लाख 65 हजार टन बाहेरील कार्यक्षेत्रातून गाळप करण्यात आला आहे. तर यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याने एक रुपयाचेही कर्ज घेतले नसून शेतकरी आणि ऊस तोडणी मजुरांचे देणे दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या