खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

jalgaon-digital
2 Min Read

पिंपळनेर । Pimpalner । वार्ताहर

जेबापूर रस्त्यालगत असलेल्या टेकडी जवळील मुरूमसाठी खोदलेल्या खड्ड्यात (pit dug for Murum) साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी (swim in the water) गेलेल्या इंदिरानगर भागातील तीन बालकांचा (Three students) पाण्यात बुडुन (drowning) दुर्दैवी मृत्यू (died) झाला. या घटनेमुळे पिंपळनेर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन विद्यार्थी उशिराने आल्याने सुदैवाने बचावले.

पिंपळनेर शहरातील इंदिरानगर भागातील मुस्लिम समाजातील हुझेप हुसेन मन्सुरी (वय 11 वर्षे इयत्ता पाचवी), आयान शफी शहा (वय 12 वर्ष इयत्ता सहावी), नोमान मुक्तार शेख (वय 16 वर्ष इयत्ता दहावी) हे तीन शाळकरी विद्यार्थी आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मदरसा सुटल्यानंतर जेबापूर रस्त्यालगत असलेल्या बिजासनी रो हाऊस जवळील टेकडी जवळील मुरूम खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले.

या तीन विद्यार्थ्यांसोबत आणखी दोन विद्यार्थी होते ते उशिराने खड्ड्याजवळ आले. पण त्यांना आपले मित्र दिसत नव्हते. परंतु खड्ड्याजवळ तिघांनी काढून ठेवलेले कपडे दिसले. त्यांनी घराकडे परत येऊन गौतम भटू पवार पहिलवान यांना घटनेची माहिती दिली.

त्यांनी लगेच पिंपळनेर पोलिसात माहिती दिली. व ते आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या खड्ड्यातून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिघांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची शहरात माहिती मिळतात रुग्णालयाकडे असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे देण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या तिघांवर कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार (दफन) करण्यात आले.

बालकांना त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी बाबा फ्रेंड ग्रुपचे गौतम भटू पवार, मुश्रफ शेख, समर्थ पगारे, अश्रफ पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. काल पांझरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह याच तरुणांनी पुरातून बाहेर काढला होता. पिंपळनेर पोलिसात प्रथमदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पीएसआय भाईदास मालचे हे करीत आहेत.

आ. मंजूळा गावीत यांनी मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची भेट घेवून नातेवाईकांचे सांत्वन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *