Friday, April 26, 2024
Homeनगरमहापालिकेला 'थ्री स्टार' मानांकन प्रदान

महापालिकेला ‘थ्री स्टार’ मानांकन प्रदान

अहमदनगर | प्रतिनिधी

नगरच्या महापालिकेने भारत स्वच्छता अभियानात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे शहराचे नाव देशात झळकले. महापालिकेला जाहीर झालेला थ्री स्टार मानांकनाचा पुरस्कार दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी स्वीकारला.

- Advertisement -

सन २०२०-२१ या सालात नगरच्या महापालिकेने भारत स्वच्छता अभियानात चांगले काम केले. रस्त्यावर ठिकठिकाणी असणाऱ्या कचराकुंड्या बंद केल्या. कचरा संकलनासाठी शहराच्या प्रत्येक भागात घंटागाडी सुरू केल्या. तया उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मोलाची मदत झाली. स्वच्छतेबाबत उल्लेखनीय कार्याची दखल घेत सरकारने महापालिकेला थ्री स्टार मानांकनाचा पुरस्कार जाहीर केला होता. तो नुकताच प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले भारत स्वच्छ अभियान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मनपाने या अभियानामध्ये भाग घेऊन २०१९-२० मध्ये २७३ व्या क्रमांकावरून ४० व्या क्रमांकावर झेप घेतली. एवढ्यावरच नगर मनपा न थांबता २०२०-२१ मध्ये नगर मनपा राज्यात दुसरी तर देशात २२ व्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळे आपले शहर हगणदारी मुक्त, कचराकुंडी मुक्त व स्वच्छ शहर म्हणून देशांमध्ये ओळख निर्माण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या