Sunday, May 5, 2024
HomeजळगावCrime # गळ्याला चाकू लावित पावणेतीन लाखाची रोकड लुटली

Crime # गळ्याला चाकू लावित पावणेतीन लाखाची रोकड लुटली

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

फॅक्टरीतून रोकड घेवून (taking cash from the factory) निघालेल्या मालकाच्या कारला (owner’s car) मागून ट्रीपलसीट येणार्‍या दुचाकीने (Hit by a bike) धडक दिली. दुचाकीस्वारांना लागले का हे बघण्यासाठी चालकासह मालक खाली उतरले असता, त्यातील एकाने चालकाच्या गळ्याला (driver’s neck) चाकू लावला (Knife applied) तर दुसर्‍याने गाडीत ठेवलेली पावणेतीन लाखांचा ऐवज (compensation of fifty three lakhs) घेवून ते पसार (Take it and spread it) झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास एमएसईबी सब स्टेशनसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील गिरणा टाकी परिसरातील नुतन अजिंठा हौसिंग सोसायटी येथील अमित बद्रीप्रसाद अग्रवाल (वय-41) हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांच्या मोठे भाऊ रोहीत अग्रवाल यांच्या नावे श्री विनायक ऑईल कॉप्रोरेशन नावाने फॅक्टरी आहे. याठिकाणी सोया रिफाइंड तेलाचा पक्का माल तयार करुन त्याची होलसेल विक्री केली जाते.

या कंपनीची देखभाल अमित अग्रवाल हे मोठे भाऊ रोहीत व वडीलांसोबत पाहतात. शनिवारी दिवसभरात तेलाची विक्रीकरुन 2 लाख 49 हजार 800 रुपयांची रोकड घेवून अमित अग्रवाल हे वडीलांसह चालक रामेश्वर नामदेव घुले यांच्यासह (एमएच 19 सीएफ 9225) क्रमांकाच्या कारने घरी जाण्यासाठी निघाले.

एमएसईबी सबस्टेशनसमोरच त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. तेव्हा अमित अग्रवाल हे चालकासह गाडीतून खाली उतरले असता, याठिकाणी धडक देणारी (एमएच 18 बीपी 1969) क्रमांकाची दुचाकी पडलेली होती.

दुसर्‍या दुचाकीस्वारांकडे दिली लांबविलेली रोकड

पिशवी लांबविताच त्याठिकाणी (जीजे 05, केवाय 1197) क्रमांकाच्या दुचाकीवरुन तीन अनोळखी इसम आहे. त्यांच्याकडे लांबविलेल्या रोकडची पिशवी देत ते तिघे रोकड घेवून पळून गेले. तर चाकूचा धाक दाखवित असलेल्या इसमाने अग्रवाल यांच्या खिशातून बँकेचे एटीएम व दोन मोबाईल काढून घेत असा एकूण 2 लाख 85 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवित त्यांनी देखील पोबारा केला. याप्रकरणी अमित अग्रवाल यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशांची मागणी करीत काढला चाकू

दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील एका इसमाला डोळ्याजवळ दुखापत झाली होती. त्यांच्यासोबत असलेले दोन इसम हे अग्रवाल यांच्याकडे उपचारासाठी पैशांची मागणी करु लागले. यावेळी अग्रवाल यांनी तुम्ही आमच्यासोबत चला आम्ही तुमच्यावर उपचार करतो असे सांगितले असता, त्यांच्यातील एकाने अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना चाकू दाखविला.

…तर दुसर्‍याने काढून घेतली पैशांची पिशवी

मालकाला चाकू दाखविताच त्यांना विरोध करण्यासाठी चालक रामेश्वर घुले यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या इसमाने अग्रवाल यांना सोडून चालकाच्या गळ्यावर चाकू लावित त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तर याचवेळी दुसर्‍या इसमाने कारमधील मागच्या सीटवर ठेवलेलेली अडीच लाखाची रोकडची कापडी पिशवी काढून घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या