Wednesday, April 24, 2024
Homeनगरशहरातील तिघे गुन्हेगार एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

शहरातील तिघे गुन्हेगार एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर | Ahmedagar

बळाचा व दहशतीचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्थेला वारंवार बाधा पोहोचवित असलेल्या नगर शहरातील तिघा सराईत गुन्हेगारांना उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तोफखाना पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.

- Advertisement -

इस्सार ऊर्फ टकलू मुक्तार शेख (रा. कोठला), अशिष रघुवीर गायकवाड (रा. तारकपूर), स्वप्निल अशोक ढवण (रा. ढवणवस्ती) असे हद्दपार केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, आताचे उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

तिघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर उपअधीक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. यावर निर्णय घेत सदरचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. हद्दपारीचे आदेश निघाल्यानंतर तिघा आरोपींना तोफखाना पोलिसांनी बुधवारी नोटीसा बजावल्या.

तिघांविरूद्ध विविध गुन्हे

हद्दपार केलेले आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, मारहाण, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. आशिष गायकवाड विरोधात पाच, इस्सार शेख विरोधात पाच तर स्पप्निल ढवण विरोधात चार गुन्हे दाखल आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेला वारंवार बाधा पोहोचवित असलेल्या आणखी काही व्यक्तीचे प्रस्ताव पोलीस पाठविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या