Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याओझर विमानतळावर आढळले तीन करोना पाॅझिटिव्ह

ओझर विमानतळावर आढळले तीन करोना पाॅझिटिव्ह

४८४ प्रवासी उतरले : १११ जणांकडे सर्टिफिकेटच नव्हते

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्य शासनाच्या गाईडलाईन्स नूसार अोझर विमानतळावर परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना करोना चाचणी रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक आहे. मागील पाच दिवसात अोझर विमानतळावर ४८४ प्रवासी उतरले.

त्यापैकी ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचे सर्टिफिकेट होते. तर, १११ प्रवाशांकडे सर्टिफिकेट नसल्याने त्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली. त्यात तीन प्रवाशी करोना पाॅझिटिव्ह आढळले. हे तिन्ही प्रवाशी मुळचे नाशिकचे असून दोन जण अहमदाबाद तर एकजण दिल्लीहून नाशिकला परतला होता. या तिघांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

दिवाळीनंतर करोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका वाढला अाहे. त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने राजस्थान, गुजरात, दिल्ली व गोवा या राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना करोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते मार्गाने दाखल होणार्‍या राज्याच्या सीमेवर चेक पाईंट उभारण्यात आले आहे.

अोझर विमानतळावरुन दिल्ली व अहमदाबाद या शहरांसाठी स्पाईस जेट, अलायन्स व ट्रु विमान कंपनीद्वारे हवाई सेवा सुरु आहे. मागील २५ नोव्हेंबरपासून अोझर विमातळावर उतरणार्‍या प्रवाशांना सोबत करोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

मागील पाच दिवसात ४८४ प्रवाशी अोझर विमानतळावर उतरले. त्यापैकि ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी निगेटिव्हचा अहवाल होता. तर ‍१११ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचा रिपोर्ट नव्हता. या प्रवाशांना विमानतळावर करोना चाचणिची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

त्यापैकी तिन प्रवाशी करोना पाॅझिटिव्ह आढळले. महापालिकेला ही माहिती कळवून पाॅझिटिव्ह प्रवाशांचे तत्काळ विलगीकरण करण्यात आले. राज्यशासनाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून विमानतळावरच करोनाची नाकेबंदी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या