Thursday, April 25, 2024
Homeजळगाववाघुर कालव्याच्या पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू

वाघुर कालव्याच्या पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू

जळगाव -Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावापासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या कालव्याच्या चारीत वाहत्या पाण्यात बुडून नशिराबादमधील भवानी नगरातील तिघा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

- Advertisement -

दरम्यान दिलीप नाथ (वय १२), आकाश विजय जाधव (वय १३), ओम सुनील महाजन (वय ११) अशी मृत बालकांची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्यामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे पोहायला व फिरायला जाणार्‍या तरुणांची संख्या वाढली आहे.

वाघूर धरण देखील पूर्णपणे भरलेले असल्यामुळे तेथे अनेक जण पर्यटनासाठी व पोहायला जातात. सोमवारी दुपारी ३ वाजता नशिराबाद येथील भवानी नगरचे रहिवासी मोहित दिलीप नाथ (वय १२), आकाश विजय जाधव (वय १३), ओम सुनील महाजन (वय ११) हे तिघेही वाघूर धरणावर पोहायला गेले होते.

दरम्यान, सुभाष वाणी यांच्या शेताजवळ पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. जवळ असणार्‍या परिसरात शेतात काम करणार्‍या नागरिकांनी घटना लक्षात येताच पोलिसांना व ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले.

यावेळी घेण्यात आलेल्या शोध मोहिमेत सर्वप्रथम मोहितचा मृतदेह हाती लागली. त्यांनतर वाहत्या पाण्यात वाहुन जातांना आकाश व ओम यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तिघेही जणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी रवाना केले. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती.

सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तिघेही बालकांच्या मृत्यूमुळे नशिराबादवर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या