Wednesday, April 24, 2024
Homeजळगावधमक्यांना भीक घालत नाही - आ.खडसे

धमक्यांना भीक घालत नाही – आ.खडसे

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

तालुक्यातील व शहरातील कुठलीही निवडणूक (Election) असो व ही निवडणूक देखील होणार आहे काही लोक मतदारांना धमक्या (Threats to voters)देत आहेत. तुमच्या गावात काम करणार नाही असे बजावत आहेत पण तुम्हाला धमकी देणारी व्यक्ती ही सहा महिन्यासाठी आहे तर मी पुढचे सहा वर्ष आमदार आहे. असे आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी सांगितले.

- Advertisement -

आ.खडसे सोबत असल्याने नो चिंता – संतोष चौधरी

भुसावळच्या निवडणुकांचे सहकारी एकट्याने लढत आलो आहे. परंतु आता ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद असल्याने या निवडणुकीत सर्व जागा सहजच निवडून येतील असे सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील म्हणाले की, आ. एकनाथराव खडसे व संतोष चौधरी हे सोबत असल्याने मला आनंद होत आहे त्यामुळे कृउबा निवडणूकच काय येणारी विधानसभा देखील नक्की विजयी होणार ही निवडणूक केवळ ट्रायल आहे, असे सांगितले

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे म्हणाले की, मविआच्या माध्यमातून सर्व निवडणुका यासाठी विजयी होतील. माजी आ. संतोष चौधरी व आ. एकनाथराव खडसे सोबत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक संजीवनी निर्माण झाली आहे व हीच एकजूट विजयाकडे घेऊन जाईल असे यांनी सांगितले.

आ.एकनाथराव खडसे, माजी आ. संतोष चौधरी व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलच्या माध्यमातून कृउबा समिती निवडणूक लढवली जात आहे.

या निवडणुकीत शेतकरी सहकारी पॅनलचे विकासो संस्था, इतर मागासवर्गीय मतदार संघातून भोळे मयूर अनिल खडका, भोळे किशोर नामदेव साकेगाव हे तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून सपकाळे जिजाराम पोपट, भुसावळ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ढाके किशोर मधुकर, वराडसिम पाटील सुभाष राजाराम सुनसगाव ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ तर पाटील नाना शामराव ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ चौधरी योगेश प्रकाश भुसावळ, लोकवाणी विजयकुमार चंद्रमल हे व्यापारी मतदारसंघ तसेच गव्हाणे कैलास विठ्ठल हमाल मापारी मतदारसंघ. ढाके शालिनी मधुकर (वराडसिम), प्रमिलादेवी पाटील (कन्हाळे खुर्द), विकास सेवा संस्था महिला राखीव गटातून तसेच विकास सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून कमलाकर कोल्हे, नितीन धांडे बाबुराव, होमा पाचपांडे, महेश भोळे, माधव पाटील, सुरेश येवले, भागवत रोनखेडे आदींची उमेदवारी आहे.

एकूण 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत. आ. एकनाथराव खडसे, माजी आ. संतोष चौधरी, अ‍ॅड.रविंद्र पाटील व आ.संजय सावकारे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व येणार्‍या सर्व निवडणुकांची ट्रायल ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या