Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; नाशिकचे हजारो कार्यकर्ते उद्या गाठणार मुंबई

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; नाशिकचे हजारो कार्यकर्ते उद्या गाठणार मुंबई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर काँग्रेसची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन (Congress Bhavan) येथे पार पडली. या बैठकीत डिजिटल सभासद नोंदणी मोहीम व उद्या मुंबई (Mumbai) येथे 07 मार्च रोजी महागाई (Inflation) विरोधात होणाऱ्या मोर्चाला जाण्याबाबत चर्चा करण्यात आली…

- Advertisement -

या मोर्चासाठी प्रत्येक ब्लॉकमधून शेकडो कार्यकर्ते मुंबईला (Mumbai) रवाना होणार असून त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. तसेच नाशिक शहरातील काँग्रेस डिजिटल सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेत सहभागी करा. दि. 15 एप्रिलला मोहिमेची मुदत संपत असून आणखी जोमाने मोहीम राबवावी, असे निर्देश शरद आहेर यांनी या बैठकीत दिले.

प्रातास्विक सुरेश मारु (Suresh Maru) यांनी केले. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, गटनेते शाहू महाराज खैरे, महिला अध्यक्षा वत्सला खैरे, अल्पसंख्याक अध्यक्ष हनिफ बशीर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, तसेच ब्लाॅक अध्यक्ष बबलू खैरे, उध्दव पवार,

दिनेश निकाळे, अण्णा मोरे, विजू पाटील, गौरव सोनार, देवेन मारू, संतोष ठाकूर, आदिनाथ नागरगोजे, धोंडीराम बोडके, प्रवीण काटे, अरुण दोंदे, सुनील निरभवणे, अकिल कादरी, तौफिक पठाण, शाहिद शेख, सुमित आहिरे, दाऊद शेख, जावेद पठाण, इसाक कुरेशी, अशोक शेंडगे, स्वाती जाधव, मीरा साबळे, वंदना पाटील, संतोष हिवाळे, रणमाळे, अनिल बहोत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या