Saturday, April 27, 2024
Homeनगर‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच

‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरत्या वर्षाला निरोप देताना व नव्या वर्षाचे स्वागत (Welcome New Year) करताना सरकारने लागू केलेल्या करोना नियमांचे (Corona Rules) नागरिकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी दिला आहे.

- Advertisement -

नगर-आष्टी मार्गावर धावली हायस्पीड रेल्वे

सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढलेला धोका (Increased Risk of Omicron), यामुळे सरकारने नागरिकांच्या उत्साहाला वेसण घातली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि शनिवार नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली (The State Government implemented the New Regulations) आहे. जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

अधीक्षक पाटील म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे नियम लागू केले आहे, त्या नियमांचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पालन करावे. सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे, पार्ट्या करणे, रात्री-अपरात्री नियमबाह्य पध्दतीने फटाके वाजवणे या सर्वांवर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा व नवीन वर्षाचे स्वागत करावे. तसेच नवीन वर्षाची सुरूवात चांगल्या पध्दतीने व्हावी, करोना पासून कशी मुक्ती करता येईल, या कालावधीत करोनाचा प्रार्दुभाव पसरणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आव्हान अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

Good Bye 2021 : करोना, अतिवृष्टी अन् अग्नी तांडव

दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने यावर पोलिसांची नजर असणार आहे. पार्ट्या करणे, गर्दी जमवणे किंवा रात्रीच्यावेळी दारू पिऊन वेगात वाहने चालविणे यावर पोलिसांची नजर असणार आहे. आज थर्टी फर्स्टच्या दिवशी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच पोलिसांचे फिरते पथके यावर लक्ष ठेवुन असणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी करोना नियमांचे पालन करून व घरबसल्या शांततेन सरत्या वर्षाला निरोप देत, नव्या वर्षाचे स्वागत करावे, असे आव्हानही अधीक्षक पाटील यांनी केले.

धमकी देत विवाहितेवर अत्याचार

800 पोलिसांचा बंदोबस्त

आज (शुक्रवार) थर्टी फर्स्ट असल्याने सुमारे 800 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा बंदोबस्त जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी दारू पिऊन वाहने चालविणे, वेगात वाहने चालविणे, इतर लोकांना त्रास होईल अशा पध्दतीने वर्तन करणार्‍यांवर पोलीस वॉच ठेवणार आहे. याशिवाय वाहतूक शाखेचे पोलीसही रस्त्यांवर असणार आहे. त्यांच्याकडूनही कारवाई केली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

कर्डिलेंच्या लग्नाला गर्दी; 10 हजाराचा दंड

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे. सुरूवातील पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यानंतर देखील कर्डीले यांनी मुलगा अक्षय यांच्या विवाहसाठी गर्दी जमविल्याने पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या