Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश...तर करोनाच्या तिसर्‍या लाटेचा ‘या’ महिन्यात कहर

…तर करोनाच्या तिसर्‍या लाटेचा ‘या’ महिन्यात कहर

नवी दिल्ली / New Delhi – देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे पण आता करोनाच्या तिसर्‍या लाटेची (third wave of coronavirus) शक्यता वर्तवली जात आहे. देशातील काही वैज्ञानिकांनी करोना तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शिगेला पोहोचेल अशी शक्यता वर्तविली आहे.

देशातील करोनाबाधित प्रकरणावर नजर ठेवणार्‍या सरकारी समितीच्या वैज्ञानिकांच्या (Govt panel scientist) मते, जर करोना संबंधित सावधगिरी बाळगली नाही तर करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान शिगेला पोहोचेल.

- Advertisement -

दरम्यान, यासोबत वैज्ञानिकांंनी सांगितलेली एक दिलासादायक बाब अशी की, यादरम्यान दुसरा लाटेमधील नव्या करोनाबाधितांची संख्येच्या तुलनेत तिसर्‍या लाटेत नवीन करोनाबाधितांची प्रकरणे अर्धी असतील.

करोनाच्या (Covid-19) दुसर्‍या लाटेने मार्च, एप्रिल, मे यादरम्यान थैमान घातले. आता जरी करोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसर्‍या लाटेचे सावट आले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट शिगेला पोहोचणार. यादरम्यान 1 लाख 50 हजारपासून ते 2 लाख इतक्या प्रमाणात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते. शिवाय वैज्ञानिकांनी सांगितले की, तिसर्‍या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु यावेळी करोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोक्याचा उल्लेख केला आहे. जर तिसर्‍या लाटेच्या वेळी करोनाच्या नवा व्हेरियंट समोर आला तर तिसरी लाटेचा वेगाने फैलाव होईल असेही वैज्ञानिकांंनी म्हटले आहे.

आयआयटी कानपूरचे प्रो.मणींद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या सुत्राने करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या सुरुवातीचा अभ्यास केला. त्यांच्या मते, करोनाच्या तिसर्‍या लाटेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करोना प्रकरणे वाढण्याची शक्यता जास्त आहे. नोव्हेंबरपासून लाटेचा वेग जास्त होऊ शकतो. तर 15 नोव्हेंबरला संक्रमणाचा आलेख घसरू लागले. तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेपेक्षा जास्त धोकादायक नसेल. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे गरजेचे आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातील देशात दररोज 1.80 लाख प्रकरणाची नोंद होईल.

‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’

- Advertisment -

ताज्या बातम्या