Tuesday, April 23, 2024
Homeजळगावतृतीयपंथियांचे गुरु जगनमामा यांचे निधन

तृतीयपंथियांचे गुरु जगनमामा यांचे निधन

जळगाव । Jalgaon

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले तृतीयपंथियांचे गुरू राणी जान उर्फ जगनमामा यांचे सोमवारी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. किन्नर समुदायाला सन्मानाने व स्वाभीमानाने जगण्यासाठी लढा देणार्‍या मामांच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले.

- Advertisement -

खरे तर किन्नरांचे अंत्यसंस्कार हे अत्यंत गोपनीय पध्दतीने होतात. याची कुणालाही माहिती मिळत नाही. मात्र मामांनी आपल्याला सर्वांच्या साक्षीने शेवटचा निरोप देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या