Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोले - तालुक्यातील देवठाण येथे आढळला तिसरा करोना बाधित

अकोले – तालुक्यातील देवठाण येथे आढळला तिसरा करोना बाधित

देवठाण | वार्ताहर | Devthan

अकोले तालुक्यातील देवठाण येथे मागील आठवड्यात करोना बाधित महिला आढळून आली होती, तिच्या संपर्कात आलेली ऐंशी वर्षांची वृद्ध महिलेचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने या परिसरातील रस्ते बंद केले आहेत.

- Advertisement -

गावात एक विवाह होणार होता. त्या विवाहाच्या निमित्ताने पाहुणे आले होते. या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली असता 80 वर्षाच्या महिलेचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला तर आज आणखी एक तिसऱ्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून या भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. स्थानिक करोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी लक्ष ठेऊन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या