Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळ्यात चोरटे पुन्हा सक्रीय; मिल्क सेंटर फोडले

धुळ्यात चोरटे पुन्हा सक्रीय; मिल्क सेंटर फोडले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून चोरट्यांनी देवपूरातील मिल्क सेंटरचे शटर तोडून 22 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

शहरातील देवपूर परिसरात असलेल्या जयहिंद कॉलनीतील इंदिरा गार्डनकडे जाणार्‍या रस्त्यावरील छत्रपती मिल्क सेंटर चोरट्यांनी फोडून 22 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे त्याने कॅमेराही फोडून टाकला आहे. चोरट्याने चोरीनंतर कुलूपही चोरुन नेले आहे.

याबाबत प्रशांत गिरधर देसले यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या