Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसाहित्य संमेलन : मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग, आतापर्यंत ‘इतक्या’ जणांनी घेतली...

साहित्य संमेलन : मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग, आतापर्यंत ‘इतक्या’ जणांनी घेतली लस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज (दि. ०३) पासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनिंग (Thermal scanning) केले जात आहे. दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जात आहे…

- Advertisement -

करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आरोग्य समितीने पावले उचलली आहेत. ज्यांनी लसीचे (Corona Vaccina) दोन डोस घेतले आहेत, अथवा लसींचा एक डोस घेतलेला आहे आणि ज्यांना कोणतेही करोनासदृश (Corona) लक्षणे नाहीत अशांना संमेलनात मुक्त प्रवेश दिला जात आहे.

ज्या व्यक्तींनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही अशांना प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळच लस देण्याची सोय नाशिक महापालिका वैद्यकीय विभागामार्फत केली गेली आहे.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजकांचे वैद्यकीय पथक येणाऱ्या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग व त्यांनी घेतलेल्या लसीकरणाचे पुरावे तपासत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट व रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी महापालिका वैद्यकीय पथकांमार्फत केली जात आहे.

संमेलनात येणाऱ्या लहान मुलांना लसीची अट लागू नाही. सर्व नागरिकांना मास्क व सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य आहे.

आतापर्यंत २६ जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी (Rapid antigen test) करण्यात आली असून आतापर्यंत सर्व निगेटिव्ह आहेत. तर १७ जणांचे आतापर्यंत लसीकरण (Vaccination) झाले आहे. ७ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या