Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपांगरीत चोरट्यांचा सुळसुळाट; लाखोंचा ऐवज लंपास

पांगरीत चोरट्यांचा सुळसुळाट; लाखोंचा ऐवज लंपास

वावी | वार्ताहर | Vavi

सिन्नर तालुक्यातील ((Sinner Taluka) सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (Sinner-Shirdi Highway) पांगरी (Pangri) येथील बुद्ध विहारात काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरी (Theft) झाल्याची घटना उघडकीस आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे येथील रहिवासी सिद्धार्थ कचरू घेगडमल हे सकाळी बुद्ध विहारात (Buddha Vihar) दर्शनासाठी गेले असता विहारातील मूर्ती गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ बुद्ध विहार परिसरात राहत असलेल्या नागरिकांना (Citizens) बोलावून मूर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आणून दिले.

Nashik Road : चोरट्यांनी रकमेसह एटीएम मशीन पळविले; घटना सीसीटीव्हीत कैद

यावेळी स्थानिक नागरिकांनी चोरीला गेलेल्या पितळी मूर्तीचे वजन सरासरी शंभर ते सव्वाशे किलो असल्याचे सांगितले. तसेच पांगरी गावातील खंडोबा मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर यासह आदी मंदिरातील पितळाची घंटा देखील चोरीस गेल्याचे समजते असून जवळपास दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी (Thieves) चोरून नेल्याचे बोलले जात आहे. तर पांगरी येथील रहिवासी महेश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ वावी पोलीस ठाण्यास कळविली.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजप तीन ते चार मंत्र्यांचे राजीनामे घेणार?

त्यानंतर वावी पोलीस ठाण्याचे (Vavi Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे व सतीश बैरागी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तर याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Accident News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या