Sunday, May 5, 2024
Homeनगरचोरी करणारे दोघे जेरबंद

चोरी करणारे दोघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बांधकाम साईटवरून कलर व कलर मारण्याचे मशीन असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत राजन जाधव (वय 19 रा. आर्दशनगर, कल्याण रोड) व नितीन अलिन परळकर (वय 19 रा. विद्या कॉलनी, कल्याण रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

निलेश चंद्रकांत गाडळकर (वय 32 रा. काटवण खंडोबा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या कल्याण रोडवरील आदर्शनगरमधील बांधकाम साईटवरून कलर व कलर मिक्सींग मशीन असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या गुन्ह्याचा तपास विष्णू भागवत यांच्याकडून केला जात असताना त्यांनी चोरी बाबत माहिती काढली.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन गाडगे, बंडू भागवत, आनंद दाणी, सुमीत गवळी, अभय कदम, सलिम शेख, आतुल काजळे यांच्या पथकाने चोरीचे संशयि आरोपी जाधव व परळकर यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या