Friday, April 26, 2024
Homeनगर...अन् उघडला नाट्यगृहाचा पडदा

…अन् उघडला नाट्यगृहाचा पडदा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नाट्यगृहाचा पडदा उघडला आणि पहिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा मान संस्कार भारती अहमदनगर समितीला मिळाला.

- Advertisement -

संस्कार भारती, अहमदनगर समितीच्यावतीने माऊली सभागृहात अभंग रंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आचार्या विश्रुतिजी, अहमदनगर समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.दीपक शर्मा, विलास बडवे, गितांजली कुरापाटी, सत्यम लुणिया, तुकाराम सुतार, खजिनदार दिनकर घोडके, समितीचे सहसंघटनमंत्री महेश कुलकर्णी, सहसचिव गिरीश वाळुंजकर, सहकोषप्रमुख वसुदेव गिरगस, साहित्य विधा प्रमुख शिरीष जोशी, श्रीराम तांबोळी, अरविंद मुनगेल, शेखर वाघ, दिलीप पंडित, योगेश पंडित, आनंद कुलकर्णी, सुरेंद्र सोनवणे, नंदकुमार देशपांडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संस्कार भारतीचे अध्यक्ष अ‍ॅड.दीपक शर्मा यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. लॉकडाउनच्या कालखंडात आम्ही दोन-तीन ऑनलाईन कार्यक्रम घेतले, पण त्यात जिवंतपणा नव्हता. आज रसिक प्रेक्षकांसमोर कला सादर करण्यास आमचा प्रत्येक कलाकार हा आसुसलेला आहे. यावेळी निमसे म्हणाले की, संस्कार भारती आणि लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर पडदा उघडला आहे.

पहिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा मान संस्कार भारती अहमदनगर समितीला मिळाला. पडदा उघडताच संस्कार भारतीच्या ध्येय गीताने नवचैतन्याने भारावून गेले. ध्येय गीतानंतर कोणतीही औपचारिकता न ठेवता संस्कार भारतीच्या नृत्य कला विधेच्या समन्वयक वैष्णवी डेरे आणि मेघना कुलकर्णी यांनी गणेश वंदना आपल्या सुरेख भरतनाट्याद्वारे सादर केली. सूत्रसंचालन अमृता देशमुख यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या