सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कौमार्य चाचणीवर घातली बंदी

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बलात्कार (Rape) तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणीवर (टू फिंगर टेस्ट) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे….

आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जाते हे निंदनीय आहे अशी खंतदेखील कोर्टाने व्यक्त केली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे.

या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याउलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार कऱण्यासारखे असून, तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखे आहे.

गुजरात पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती आली समोर; फिटनेस सर्टिफिकेटशिवाय….

ही चाचणी घेतली जाऊ नये. लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे. पण सत्यापेक्षा मोठे काही नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.

गुजरात पूल दुर्घटना : पूल कोसळतानाचं CCTV फुटेज आलं समोर

महिलेने दिलेली साक्ष आणि तिच्या लैंगिकतेचा काही संबंध नाही. एखादी स्त्री केवळ लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्याने तिच्यावर बलात्कार झाला असे सुचवणे ही पुरुषप्रधान मानसिकता आणि लैंगिकतावादी आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

तेलंगणा हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. तेलंगण हायकोर्टाने बलात्कार प्रकरणी ट्रायल कोर्टाने नोंदवलेली शिक्षा रद्द केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *