Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोना बळींची संख्या वाढली

नाशिक जिल्ह्यात करोना बळींची संख्या वाढली

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात कारोनाचा कहर सुरूच असून सलग सहाव्या दिवसी दोन हजार पेक्षा अधिक नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर एकाच दिवसात या टप्प्यातील सर्वाधिक 15 बळी गेले आहेत. आता तरी नागरीकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मागील चोवी तासात 2 हजार 644 पॉटिव्ह रूग्ण आढळून आले ओत. परिणामी आतापर्यंत जिल्ह्याचा करोना रूग्णांचा आकड्याने 1 लाख 53 हजार 561 चा टप्पा गाठला आहे. तर आता मृत्यूदरही वाढत असून मागील चोवीस तासात कोरोनाचे 15 बळी गेले आहेत. सोमवारी हा आकडा 12 इतका होता.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज सरासरी दोन हजार नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत. रविवारी हा आकडा अचानक 2 हजार 644 वर पोहचला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 53 हजार 561 च्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 19 हजार 865 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आहे.

मागील चोवीस तासात 2393 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 34 हजार 91 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 644 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 480 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा लाखाजवळ 99 हजार 54 वर पोहचला आहे. आज ग्रामिण भागातील 827 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 45 हजार 75 झाला आहे. मालेगावात 259 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 7 हजार 481 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 1 हजार 951 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज विक्रमी वाढ झाली आहे. जिल्ह्यात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील 6 तर ग्रामिण भागातील 9 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 247 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 642 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 455 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 123 तर मालेगाव येथील 49 आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 1,53,561

* नाशिक : 99,054

* मालेगाव : 7,481

* उर्वरित जिल्हा : 45,075

* जिल्हा बाह्य ः 1,951

* एकूण मृत्यू: 2,247

* करोनामुक्त : 1,34,091

- Advertisment -

ताज्या बातम्या