Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय होणार

जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय होणार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात तयारी सुरु आहे. मात्र, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवरचा निर्णय महत्वाचा असल्याचे सूचित केले आहे.

माध्यमिक शाळेतील 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात राज्यशासनाने अटी व नियमांचे पालन करुन मार्गदर्शेक सूचना दिल्या असल्या तरी वर्ग सुरु करण्याचा निर्णय स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी या बाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव

जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्यशासनाने सूचना दिल्या असल्या तरी याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात आज शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जळगाव

यासंदर्भात आज दि.21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या ऑनलाईन मिटींगमध्ये निर्णय होणार आहे. या बैठकीवरच शाळांचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले असले तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर शालेय शिक्षण समिती, शालेय व्यवस्थापन समिती यांनी एकत्रित निर्णय घ्यावयाचा आहे.

त्यासाठी पालकांची सुद्धा परवानगी महत्वाची आहे. जे पालक परवानगी देतील त्यांचे पाल्य शाळेत येऊन शिक्षण घेतील. तर जे पालक आपल्या पाल्यांना परवानगी देणार नाही. त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण सचिव आदींच्या उपस्थितीत दि.21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मिटींगमध्ये काय निर्णय होतो, याविषयी उत्सुकता लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या