Thursday, April 25, 2024
Homeनगरस्वस्तात सोने देणारे चौघे जेरबंद

स्वस्तात सोने देणारे चौघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वस्तात सोने देण्याचे आमिष (The lure of cheap gold) दाखवून दरोडा टाकणार्‍या टोळीतील चौघांना अटक (robbery arrested) करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. रामदास चंदन भोसले (वय 50), परमेश्वर पविकांत काळे (वय 20), शिवदास रामदास भोसले (वय 23), प्रतिक रामदास भोसले (वय 19 सर्व रा. घोसपुरी ता. नगर) अशी अटक (Arrested) केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) संयुक्त केली.

- Advertisement -

संदीप धागे नामक व्यक्तीने संपर्क करून औरंगाबाद येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व त्यांच्या बंधूला स्वस्तात सोने देण्याचे आमिष (The lure of cheap gold) दाखविले होते. या आमिषाला बळी पडून ते दोघे 20 जुलै रोजी नगर तालुक्यातील सारोळा कासार (Sarola Kasar) शिवारात आले. तेथे असलेल्या आठ ते 10 जणांनी काशिदे बंधूंना मारहाण (Beating) करीत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल असा सात लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. काशिदे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास एलसीबी (LCB) व नगर तालुका पोलीस करत असताना आरोपींच्या ठिकाणाबाबत पोलिसांनी माहिती काढली. पोलिसांच्या चार पथकांनी नगर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चौघांना अटक केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (DSP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, धनराज जारवाल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या