खाकीच्या धाकाने ओढून नेलेली फॉर्च्युनर केली परत!

jalgaon-digital
1 Min Read

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

विनापरवाना सावकारकीची (Unlicensed lending) माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (PI Chandrashekhar Yadav) यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राशीननजीक राहणारे सचिन विलास पाटील, (रा. काळेवाडी) यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली. त्यामुळे बेकायदा नेलेले वाहन सावकाराने परत केले. (The illegally taken vehicle was returned by the lender)

पाटील यांनी वर्षभरापूर्वी परीटवाडी येथील एका सावकाराकडून व्याजाने पैसे (Lending Intrest Money) घेतले होते. त्या सावकारास वेळेवर व्याज देत होते. परंतु पैशाची वेळेत परतफेड न झाल्याने त्या सावकाराने व्याजाच्या रकमेची मागणी करत 15 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी (Fortuner car) (एमएच 12 केडब्ल्यू 25) बळजबरीने ओढून नेली असल्याचे पाटील यांनी यादव यांना सांगितले होते. या तक्रारीची दखल घेत त्यांनी राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ(Sub-Inspector of Police Bhagwan Shirsath), पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे आदींना माहिती देऊन संबंधित सावकारास पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्याचा आदेश दिला.

सावकाराला पोलीस स्टेशनला बोलावताच त्याने गाडी त्वरित परत केली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव (Annasaheb Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *