Friday, April 26, 2024
Homeधुळेगटखळ नदीला पुर, पिंपळनेरशी संपर्क तुटला

गटखळ नदीला पुर, पिंपळनेरशी संपर्क तुटला

पिंपळनेर – pimpalner – वार्ताहर :

येथील गटकळ नदीला पूर आला आहे. त्यामुळे विरखेल व धामणदर गावांचा पिंपळनेशी संपर्क तुटला आहे.

- Advertisement -

नागरिकांना नदीवरील फरची पुलावरून जिव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.अनेक वर्षापासून गटखळ नदीवर पुलाची मागणी होत आहे.

या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेवटचे टोक असलेले धामणदर व विरखेल ही दोन्ही गावे जवळ असून यांचा एकमेव मार्ग गटकळ नदीवरील फरशी पुलावरून आहे.

सततच्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. पूर आला तर फरशी पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क बल्हाणे, पिंपळनेर व इतर सर्व गावांशी तुटतो.

या गावांना कोणताही पर्यायी रस्ता नसल्यामुळे नाईलाजाने जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. ही परिस्थिती प्रत्येक वर्षी असते. काहीवेळा रुग्णांच्या बाबतीत दवाखान्यात नेतांना मोठा त्रास होत असतो.

गावाचे सरपंच नामदेव चौधरी, उपसरपंच संजय भदाणे आणि गावकर्‍यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मोठ्या पुलाबाबत मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. आता मात्र काही नागरिकांना आपला जिव या पुलासाठी पुरामध्ये समर्पण करावा का, असा प्रश्न उपसरपंच संजय भदाणे यांनी उपस्थित केला आहे.

अनेक आमदार, खासदार येऊन गेले. परंतू या पुलाची मागणी कोणीही पूर्ण करू शकल नाही. तरी प्रशासनाने समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या