Thursday, April 25, 2024
Homeनाशिकराहुड घाटात 'द बर्निंग' बसचा थरार

राहुड घाटात ‘द बर्निंग’ बसचा थरार

उमराणे | वार्ताहर | Umrane

एसटी महामंडळाच्या बसेसला (Bus) आग (Fire) लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील उमराणे येथील राहुड घाटात (Rahud Ghat) शहादा-मुबंई बसला आग लागल्याची घटना घडली असून आगीत बसचा पुढचा भाग जळून खाक झाला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथून मुंबईला (Mumbai) जाणारी एसटी महामंडळाची बस क्र एमएच २० बी.एल. ४१२८ आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास उमराणा जवळील ५ किमीवर मुबंई-आग्रा रोडवर राहुड घाट चढतांना पहिल्या वळणावर चालक सचिन जगताप यांच्या सीट खाली धूर असल्याचे शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी चालकास सुचित केले.

त्यानंतर जगताप यांनी त्वरित बस रस्त्याच्या (Road) कडेला थांबवत तात्काळ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी वाहक रवींद्र नागरे यांनी बसमधील २५ प्रवाशांना खाली उतरवले. तर बसचा पुढील भाग पेटल्याने तात्काळ सोमा कंपनी व मालेगाव नगरपालिका अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या परंतु तोपर्यंत बसचा पुढील भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने चालकाने समय सूचकता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, यावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याने एपीआय रवींद्र जाधव, पोलीस हवालदार अमोल जाधव, भाऊसाहेब गुळे, रवींद्र पडोर आदींनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करून प्रवाशांना (Passengers) दुसऱ्या बसने रवाना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या