Friday, April 26, 2024
Homeनाशिकवस्त्रोद्योग समिती यंत्रमागधारकांना भेटणार; समस्या निराकरणासाठी शासनाला देणार अहवाल

वस्त्रोद्योग समिती यंत्रमागधारकांना भेटणार; समस्या निराकरणासाठी शासनाला देणार अहवाल

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राज्यातील यंत्रमाग व्यवसाय (Loom business) विविध समस्यांच्या भोवर्‍यात सापडला आहे. या उद्योगास संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी राज्यशासन (state government) सकारात्मक आहे.

- Advertisement -

यंत्रमाग उद्योगातील समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाने वस्त्रोद्योग क्षेत्रातील (Textile sector) तज्ञांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दि. 31 मार्चरोजी भिवंडी (Bhiwandi) येथे तर दि. 1 एप्रिलरोजी मालेगावला (malegaon) प्रत्यक्ष भेट देवून यंत्रमाग धारकांच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष अब्दुल लतीफ अन्वर (Committee Chairman Abdul Latif Anwar) यांनी दिली.

येथील उर्दु मिडिया सेंटरमध्ये (Urdu Media Center) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना समितीचे अध्यक्ष लतीफ अन्वर यांनी ही माहिती दिली. समितीतर्फे होणार्‍या कामांची माहिती यावेळी अन्वर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारचे (central government) वस्त्रोद्योग धोरण (Textile policy), वीजबील (Electricity bill) सवलतीचा अभाव आणि त्यातच वीजदरवाढ (Power price hike), अनुदानातील कपात, सूत भावातील चढउतार, परदेशी कापडाची स्पर्धा आदी समस्यांमुळे यंत्रमाग व्यवसाय आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. तेजी-मंदीच्या गर्तेमुळे यंत्रमाग उद्योजक अक्षरश: हताश झाले आहेत.

यंत्रमाग बंद ठेवले जात असल्याने कामगारांची देखील आर्थिक कोंडी होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ञांची समिती शासनाला अहवाल देणार आहे. येत्या मे महिन्यात रमजान सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर समितीने अभ्यास दौर्‍याचे नियोजन केले आहे. ही समिती यंत्रमाग बहुल भागात प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करेल. समस्यांचा आढावा घेवून तज्ञांशी चर्चा व विचारविनीमय करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख (Textile Minister Aslam Sheikh) यांना अहवाल सादर केला जाईल.

येत्या शुक्रवारी (दि.1) समिती सदस्य मालेगाव (malegaon) दौर्‍यावर येणार असून दुपारी 3 वाजता किदवाई रस्त्यावरील उर्दु शाळा (Urdu school) क्रमांक एकमध्ये हज समिती सभागृहात यंत्रमागधारक संघटनांशी चर्चा होईल. या बैठकीस पॉवरलूम विकास समिती (Powerloom Development Committee), पॉवरलूम अ‍ॅक्शन कमेटी, पॉवरलूम ओनर्स को-ऑप. इंडस्ट्रीज, इंडस्ट्रियल को-ऑप. असोसिएशन, इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन आदी संस्था संघटनांना निमंत्रित करण्यात आले असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेस शफिक अहमद, अब्दुल हलीम सिद्दीकी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या