Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रटीईटी घोटाळा : अजून एकाला अटक

टीईटी घोटाळा : अजून एकाला अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याची पाळेमुळे नाशिक पर्यंत पोहचली आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय ३३ ) याला पुणे सायबर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये भरून हरकळ बंधूंना सूर्यवंशीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले तब्बल ८० लाख रुपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून देण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. आरोपी मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशीलान्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

दरम्यान, टीईटी घोटाळ्यातील गुन्ह्याची व्याती खूप मोठी आहे. त्यामुळे यातील प्रत्येक आरोपीकडे कसून चौकशी करण्यावर पोलीस या भर देत आहेत. आरोपी मुकुंदा सुर्यवंशीने दिलेल्या माहिती नंतर आता या पेनड्राईव्हमध्ये माहिती दिलेले विद्यार्थी कोण आहेत याचा शोधही पोलिसांकडून केला जात आहे. मार्क वाढवण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत? ते आरोपी सूर्यवंशी पर्यंत कसे पोहचले. नेमकं किती पैसे दिलेत या सगळयाचा शोध पोलीस घेणारा आहेत.

पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. तसेच अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला दिले.

आश्विनकुमार याने टीईटी – २०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास ३० लाख रुपये दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र यामध्येअजूनही आर्थिक व्यवहारांची देवाण घेवाण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपासही सुरू आहे.

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी दोघांना अटक

टीईटी पाठोपाठ म्हाडा पेपर फुटी प्रकरणात देखील पुणे सायबर पोलीसांनी काल दोन महत्त्वाच्या दलालांना अटक केली आहे . या दोन्ही आरोपींना लातूरमधून अटक केल्याची माहिती सायबर पोलीसांनी दिली. इब्राहिम पठाण आणि कलिम खान अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी देखील या घटनेतील मुख्य आरोपी हरकळ बंधूना खान आणि पठाण यांनी कोट्यवधी रुपये दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनातरच या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात हे दोघेही मुख्य एजंट असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या