Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतयारीला लागा ! येत्या सप्टेंबर मध्ये टीईटी होणार

तयारीला लागा ! येत्या सप्टेंबर मध्ये टीईटी होणार

नाशिक | Nashik

महाराष्ट्रामध्ये टीचर्स एजिबिलिटी टेस्ट (TET Exam) यंदा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. नुकतीच पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन (Maharashtra State Council Of Examination) कडून त्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान शिक्षणक्षेत्रामध्ये शिक्षकी पेशा स्वीकारू इच्छिणार्‍या उमेदवारांना ही टीचर्स एजिबिलिटी टेस्ट पार करणं आवश्यक आहे. १९ जानेवारी २०१९ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता (TET Pass Certificate) आता ७ वर्षावरून आजीवन करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामुळे आता अनेकांना या परीक्षेबाबत उत्सुकता वाढली आहे.

साधारण TET २०२१ ही ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामध्ये ऑप्टिकल मार्क्स रेकक्निशन (Optical Marks Recognition) च्या आधारे ही परीक्षा होणार आहे. जुलै २०२१ मध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. आम्ही ऑनलाईन जाण्याचा विचार करत होतो पण त्यासाठी अजून काही काळ जाईल. सध्या ही परीक्षा ऑफलाईन (Offline Exam) माध्यमातूनच घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी परीक्षा २०१३ साली घेण्यात आली होती. त्यानंतर सहा वेळेस परीक्षा घेण्यात आल्या आहेत. २०१९ ला राज्यात शेवटची टीईटी झाली होती.

मागील वर्ष दीड वर्षात राज्यात असलेलं कोरोना संकट पाहता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात ही परीक्षा होणं अपेक्षित होते पाण तेव्हा देखील कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आता सप्टेंबर २०२१ मध्ये टीईटी २०२१ परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या