Friday, April 26, 2024
Homeनगरटीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला

टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने (Maharashtra Government) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2021 (Teacher Eligibility Test) घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवार दि. 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया (Online application process) सुरू होणार आहे. या निर्णयामुळे भावी लाखो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित-विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षकपदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेबाबत सविस्तर माहिती https://mahatet.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2 सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया तीन ऑगस्टपासून सुरू होत असून, 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती परिषदेने दिली आहे.

टीईटीचे वेळापत्रक

– ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : 3 ते 25 ऑगस्ट

– प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर

– शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – एक : 10 ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)

– शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – दोन : 10 ऑक्टोबर (वेळ – दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)

- Advertisment -

ताज्या बातम्या