Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभुजबळ फार्मवरील 60 अति जोखमीच्या व्यक्तींची चाचणी

भुजबळ फार्मवरील 60 अति जोखमीच्या व्यक्तींची चाचणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.21) अनेक कार्यक्रमांना व बैठकांना हजेरी लावल्यानंतर आज ते करोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या पथकांने पालकमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म याठिकाणी जाऊन त्यांच्या संपर्कातील 50 जणांची यादी तयार करुन त्यांचे स्वॅब जिल्हा रुग्णालयातील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविले. दरम्यान आज मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी मास्क न वापरणार्‍यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन करोना रुग्णांचां आकडा वाढत चालला असुन शहरातील लग्न सोहळे, समारंभ, भाजीपाला मार्केट, बाजारपेठा – हॉटेलातील गर्दी यामुळे करोना बाधीतांची संख्या वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी शहरात अनेक कार्यक्रम व बैठकांना हजेरी लावल्यानंतर त्यांना त्रास झाला. त्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ते मुंबईला उपचारासाठी रवाना झाले.

स्वत: भुजबळ यांनी संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असुन मनपाच्या वैद्यकिय पथकाने भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांचे कुटुंबिय, स्टॉफ, त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते, बदोबस्तांतील पोलीस अशा संपर्कातील 60 जणांची यादी तयार करीत त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले. हे सर्व नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असुन याचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे.

दिवसभरात 50 हजार रुपयांचा दंड

शहरातील करोना संसर्ग रोकण्यासाठी महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडुन मास्क न वापरणार्‍यांवर कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. आज (दि.22) मनपाच्या पथकांना मास्कचा वापर न 226 जणांवर दंडात्मक कारवाई करीत 50 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात ना.रोड विभागातून 40 केसेस व 4000 रुपये दंड, ना.पश्चिम विभागात 35 केसेस व 7000 रु. दंड, ना. पुर्व विभागात 21 केसेस व 9000 रु. दंड, नवीन नाशिक विभागात 36 केसेस 7200 रु. दंड, पंचवटी विभागात 52 केसेस व 10,400 रु. दंड आणि सातपूर विभागात 42 केसेस व 8400 रु. दंड अशी दंडाची कारवाई करण्यात आली आली. दरम्यान एप्रिल 2020 ते 18 फेब्रवारी 2021 या दरम्यान मनपाकडुन 4 हजार 6 जणांवर दंडात्मक कारवाई करीत 8 लाख 1400 रुपये वसुल करण्यात आला आहे.

1 हजार रु. दंडाचा आदेश जारी

नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020मधील नियमांनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार मास्क न वापरणार्‍यांविरुध्द 1 हजा रुपये दंडाचा आदेश जारी केला आहे. यानुसार मनपा हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन प्रमुख यांनी नेमलेले पथके, जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त असलेले अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, नेमलेल्या पथकातील कर्मचारी यांच्याकडुन दंडाची कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात नमुद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या