Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याSave Soil : मृदेचा र्‍हास टाळण्यासाठी परीक्षण महत्वाचे

Save Soil : मृदेचा र्‍हास टाळण्यासाठी परीक्षण महत्वाचे

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास माती परीक्षण (Soil testing) गरजेचे आहे. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठी मदत होते.

- Advertisement -

माती परीक्षण म्हणजे जमिनीची (Land) कमीत कमी वेळेत केलेली रासायनिक व भौतिक तपासणी होय. यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते व पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.

माती परीक्षणानुसार (Soil Testing) योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच पण अन्नद्रव्यांवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते.

पिकांना विविध प्रकारच्या 17 अन्नद्रव्यांची कमी प्रमाणात गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये, हवा, पाणी व जमिनीतून शोषून घेतात. जमिनीत सतत पिके घेतली जात असल्यामुळे तसेच अधिक उत्पादन देणार्‍या जातींची लागवड व सधन शेती पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होते.

त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिके जास्त प्रमाणात शोषून घेतात. म्हणून त्याचा पुरवठा खतांद्वारे करण्यात येतो. पिकाला ज्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज आहे त्यानुसार पुरवठा करणे ही अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा दिल्यास सर्वसाधारणपणे 15 ते 40 टक्के फायदा शेतकऱ्यांना (Farmers) मिळण्यास मदत होते.

माती परीक्षण करणे काळाची गरज आहे. बहुतांश जमीनी समस्याग्रस्त झाल्या असुन, ख़तांना प्रतिसाद देत नाहित. पिकांचे दर्जेदार व अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी जमिनीची सुपिकता व शाश्वत उत्पादकता टिकविणे आवश्यक आहे. बहुतांश जमिनित पिकांना आवश्यक असणाऱ्या विविध अन्नद्रव्यांपैकी काही अन्नद्रव्यांची कमतरता व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झालेले दिसते. काही ज़मीनी या क्षारपड़ अथवा चोपण झालेल्या असून त्यात काही ठराविक पीकेच घेता येतात. या आणि इतर बाबी माहित करुन घेण्यासाठी तसेच जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म जाणुन घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

– डॉ. योगेश जयंत पाटिल, मृदा शास्त्रज्ञ, कृषि संशोधन केंद्र, निफाड

जी जमीन ओलिताची आहे; ज्यात आर्द्रता, ओलावा आहे, त्या जमिनीतील मृदेचे बहुवार्षिक आणि एक वार्षिक या प्रकारात पृथक्करण करणे आवश्यक आहे. म्हणजेच बहुवार्षिक पिकांमध्ये फळझाडे आणि एक वार्षिक पिकांमध्ये भाजीपाला किंवा खरीप रबी पिके यांचा समावेश होतो. त्यात वापरात आलेल्या खतांचे प्रमाण कसे ठेवायचे त्याचा अभ्यास म्हणजे मृदेचे पृथ:क्करण होय.

– संजय किसनराव घडवजे, शेतकरी, मु.पो.तिसगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या