Tuesday, April 23, 2024
HomeUncategorized'फ्लाय बिग' एअरलाइन्सकडून चाचपणी

‘फ्लाय बिग’ एअरलाइन्सकडून चाचपणी

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबादहून इंदौर (Indore) , नागपूर (Nagpur) आणि पुणे (Pune) या तिन्ही शहरांसाठी फ्लाय बिग’ या एअरलाइन्सची विमानसेवा (Flybig airlines) सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या एअरलाइन्सने या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एअर इंडिया (Air India) आणि इंडिगो (Indigo) च्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. कोरोनाच्या विळख्यात औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीवर मोठा परिणाम झाला. स्पाईस जेट (Spice Jet) , ट्रजेटची विमानसेवा बंद पडली.

तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना आटोक्यात आला आणि जनजीवन पूर्वपदावर आले. या सगळ्यात विमानसेवाही आता पूर्वपदावर येत आहे. विमान प्रवाशांचीही संख्या आता वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘फ्लाय बिग’ (Flybig) या विमान कंपनीने औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली आहे. छोट्या ७२ आसनी एटीआर विमानाद्वारे इंदूर, नागपूर आणि पुणे या

शहरांसाठी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ही चाचपणी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या