Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedभारतात धावणार टेस्लाची इलेक्ट्रिक कार

भारतात धावणार टेस्लाची इलेक्ट्रिक कार

मुंबई – Mumbai

अमेरिकन कार कंपनी टेस्लाने भारतामध्ये एंट्री केली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता ही प्रतीक्षा संपली असून टेस्ला कंपनीनं ८ जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे

- Advertisement -

टेस्ला कंपनीनं त्यांचं बंगळूर येथे ऑफिस सुरु करण्यासाठी निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. कंपनीनं भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची देखील नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कंपनीचं स्वागत केलं आहे.

भारतीय रस्त्यांवर यावर्षी टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार धावणार आहे. भारतीय बाजारपेठेत पूर्ण तयारीसह येण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे अगदी लगेच जानेवारी महिन्यात नव्या कारचं बुकींग सुरु होण्याची शक्यता नाही. नव्या कारच्या बुकींगसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

टेस्ला कंपनीची ही इलेक्ट्रीक कार भारतामध्ये सर्वात प्रथम दाखल होणार आहे. ही कंपनीची सर्वात जास्त वापरली जाणारी कार असून जागतिक बाजारपेठेत 2013 साली दाखल झाली आहे. त्याचबरोबर ही टेस्लाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या