Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'हे' काम करा आणि ७३० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवा; एलोन मस्क यांची...

‘हे’ काम करा आणि ७३० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवा; एलोन मस्क यांची घोषणा

दिल्ली l Delhi

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी १३ जानेवारीला अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एलोन मस्क यांचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. त्यांनी ट्विट करत १०० मिलियन डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. १०० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ही किंमत साधारण ७३० कोटी रुपये होते.

- Advertisement -

एलोन मस्क यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाला मी १०० दशलक्ष डॉलर्स दान देणार आहे.’ तसेच दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल.’ असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एलोन मस्क यांनी केलेली घोषणा त्यांच्या विविध प्रकारच्या उद्योगांशी संबंधित आहे. अलीकडे त्यांचे विविध उद्योग पर्यावरण समस्या संपवण्यासाठी तांत्रिक उपाय शोधत आहेत. वातावरणातील बदल संतुलित ठेवण्यासाठी अनेक प्लँट्समधून उत्सर्जन रोखणे हे देखील त्यापैकी एक आहे. दरम्यान या तंत्रज्ञानाचा अद्याप इतका विकास झाला नाही आहे. सध्या, हवेतून कार्बन काढून टाकण्याऐवजी त्याचे उत्सर्जन कमी करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने असे सांगितले होते की असे तंत्रज्ञान लवकरात लवकर आणण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे कार्बन कॅप्चर करता येईल. जगातील बर्‍याच देशांमध्ये, नेट-झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक असेल.

दरम्यान, एलोन मस्क यांनी बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांनी सुरू केलेली योजना, ‘द गिव्हिंग प्लेज’ वर २०१२ मध्ये स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत स्वाक्षरीकर्त्यास त्याच्या आयुष्यात त्याच्या मालमत्तेपैकी कमीतकमी अर्धी रक्कम दान करावी लागेल. हे दान प्रामुख्याने विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण, ऊर्जा संशोधन, बालरोग संशोधन आणि मानवी अंतराळ संशोधन संशोधन यासारख्या क्षेत्रात वापरले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या