Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, शोधकार्य सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, शोधकार्य सुरु

श्रीनगर | Srinagar

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) बांदीपोर (Bandipore) येथे सुरक्षा दलाच्या संयुक्त दलावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack) केल्याची घटना घडली आहे….

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी (Terrorists) सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर ग्रेनेडने हल्ला केल्याचे समजते. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास

केंद्रीय राखीव निमलष्करी दलाच्या (CRPF) संयुक्त पथकावर हा हल्ला करण्यात आला. जखमींमध्ये सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

एसटी विलिनीकरण अहवालासाठी राज्य सरकारला वाढीव मुदत; हायकोर्टाचे निर्देश

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमुळे दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. यामुळेच सुरक्षा दलांवर असे भ्याड हल्ले केले जात असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या