Friday, April 26, 2024
Homeनगरकार्यकाळ संपला तरी सभासदांची लुट

कार्यकाळ संपला तरी सभासदांची लुट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी केल्यास कर्ज वसूलीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. बँकेने होऊ घातलेली पोटनियम दुरूस्ती झाल्यास

- Advertisement -

बँकेचे अस्तित्व संपण्याची भिती आहे. त्यामुळे शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्याचा घाट संचालक मंडळाने घालू नये. तसे झाल्यास त्याला गुरूकुल मंडळ पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल. या संचालक मंडळाची कालमर्यादा संपली आहे. नैतिकता ठेऊन त्यांनी राजीनामे दिले पाहिजे. कार्यकाळ संपला तरी संचालक आर्थिक निर्णय घेऊन सभासदांची लूट करत असल्याचा आरोप गुरूकुल मंडळाने केला आहे.

बँकेच्या राज्यव्यापी धोरणाला विरोध करण्यासाठी गुरूकुल मंडळाने आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. यावेळी शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, संतोष भोपे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, राजेंद्र ठाणगे, वृषाली कडलग, भिवसेन चत्तर, रघुनाथ लबडे, सिताराम सावंत, भास्कर नरसाळे, संजय नळे, शिवाजी रायकर, सुखदेव मोहिते आदी उपस्थित होते.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली तरी श्रीगोंदा शाखेच्या नूतनीकरणासाठी तब्बल 17 लाख रूपये मंजुरीचा ठराव करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभा अभासी पद्धतीने घ्यायची असल्याने अहवाल, सभागृह असे मोठे खर्च वाचले तरीही सभेसाठी 9 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बँक शताब्दीसाठी काढलेल्या एक कोटीपेक्षा जास्त रकमेची सर्व संचालक मंडळाने कशी विल्हेवाट लावली ते कळायला मार्ग नाही. घड्याळ खरेदीतील अपारदर्शक व्यवहारामुळे या संचालक मंडळाने स्वत:ची पुरती बेअब्रू करून घेतली आहे.

बँकेच्या गदारोळात विकास मंडळातील घोटाळे विश्वस्ताकडून झाकण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात बँक शताब्दीचे पैसे विकास मंडळासाठी वापरण्याचे काहीही कारण नव्हते. एका राजकीय नेत्यापुढे चमकण्यासाठी सभासदांचे 15 लाख रूपये लाटण्यात आल्याचा आरोपी गुरूकुल मंडळाने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या