Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग

सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात एप्रिल तसेच ऑगस्ट 2020 अखेर जिल्हयातील 783 ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आली आहे.

- Advertisement -

या सर्व ग्रामपंचायंतीवर उद्भवलेल्या कोविड परीस्थितीमुळे प्रशासक नेमण्यात आले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वेध पदाधिकार्‍यांना लागले असून ग्रामीण भागात याची पूर्व तयारीसह चाचपणी केली जात असून सरंपच पदासह महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत कधी जाहिर करण्यात येते याकडे सर्वच राजकारणातील धुरीणांकडून उत्सुकता आहे.

जिल्ह्यात 1152 ग्रामपंचायती असून 780 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टअखेर संपली असून, 3 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल 2020 अखेरच संपुष्टात आली होती.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसह पहिल्या टप्प्यातील एकूण 783 ग्रामपंचायतींच्या 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंचपदांची आरक्षण सोडत जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात धेणार आहे.

त्यामध्ये ग्रामपंचायतनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत त्यानंतर लगेचच 8 ते 10 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने पुरूष सरपंच पदासह महिला सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी आरक्षीत होते, याकडे राजकिय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपातळीवर आरक्षण तालिका असून पहिल्या टप्प्यात 783 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी ग्रामीण स्तरावर प्रारूप मतदार याद्यांची प्रसिदध केल्या असून हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या हरकतींची सुनावणी घेण्यात येवून गुरूवार दि.10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन सुत्रांनी दिली. त्यानुसार ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी लवकरच रंगणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या