Saturday, April 27, 2024
Homeनगरपदाची मुदत संपूनही संगमनेरातील काही नगरसेवकांची ‘सेवा’ मात्र सुरूच

पदाची मुदत संपूनही संगमनेरातील काही नगरसेवकांची ‘सेवा’ मात्र सुरूच

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत संपल्याने नगरपालिकेवर प्रशासक राज सुरू झाले आहे. आपल्या पदाची मुदत संपल्याचे माहीत असूनही काही नगरसेवकांना मात्र याचा विसर पडल्याचे दिसत आहे. हे नगरसेवक आजही आपण सत्तेवर असल्याच्या व नगरसेवक असल्याच्या अविर्भावात काम करत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

संगमनेर नगरपालिकेची मागील सार्वत्रिक निवडणूक पाच वर्षांपूर्वी झाली होती. डिसेंबर महिन्यात विद्यमान नगरसेवकांच्या कारकीर्दीची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर नगरसेवकांना नगरसेवक म्हणून काम करता येत नाही. नगरपालिकेच्या कोणत्याही कामकाजामध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही. एखादी व्यक्ती कोणत्याही कारणावरून पालिका सदस्य असण्याचे बंद झाले असेल तर पालिका सदस्य या नात्याने तिने धारण केलेली सर्व अधिकार पदे वस्तुतः सोडून दिली पाहिजेत असे नगरपालिका कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे. असे असतानाही संगमनेरातील काही नगरसेवक अद्यापही नगरसेवक असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत.

संगमनेर नगरपालिकेची मुदत संपल्याने या नगरपालिकेचा कारभार प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक यांची भूमिका आता संपलेली आहे. असे असतानाही काही नवे नगरसेवक मात्र अद्यापही आपण नगरसेवक असल्याच्या अविर्भावात वागत आहे. नगरपालिकेत येवून अधिकारी कर्मचार्‍यांवर रुबाब करणे, त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे असे काम काही जण करताना दिसत आहेत. पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेले काही नगरसेवक उशिरा जागे झालेले आहेत. नागरिकांचे सेवा करण्याचे काम त्यांनी जोरात सुरू केले आहे. नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते हे गृहीत धरून काही जण कामाला लागले आहेत. त्यांच्या कृतीची शहरात मात्र खमंग चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या