Thursday, April 25, 2024
Homeनगरमुदतठेव पावतीची रक्कम बुडविली

मुदतठेव पावतीची रक्कम बुडविली

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पद्मश्री ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील ठेवीची रक्कम बुडाल्याने पतसंस्थेचे अध्यक्ष शरद पेरणेंसह तालुक्याचे ज्येष्ठनेते सुभाष पाटील, शशिकला पाटील व संचालक मंडळावर राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

भिमराज जयवंत रहाणे रा. कुक्कडवेढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, पद्मश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वांबोरी यांच्याकडे ठेव ठेवलेली ठेव पावतीची रक्कम मुदत संपल्यानंतर होणारे व्याजासह रक्कम फिर्यादीस देणे असताना पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळात कर्तव्यात असताना देखील त्यांनी रक्कम रुपये 6 लाख 10 हजार 510 रुपये अदा न करता रकमेची फसवणूक केली.

रहाणे यांच्या फिर्यादीवरून अध्यक्ष शरद शिवाजी पेरणे, उपाध्यक्ष जनार्दन राघुजी ढोकणे, संचालक सुभाष दत्तात्रय पाटील, दिलीप यशवंत पाटील, शशिकला सुभाष पाटील व इतर 7 ते 8 जण यांच्याविरुद्ध गु.र.नं. 691 भा.दं.वि.कलम 420, 409, 34 व महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्टचे कलम 3 प्रमाणे फसवणुकीचा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जिल्हा न्यायालय 9 व अतिरिक्त सत्र न्यायालय, अहमदनगर यांच्याकडील जावक क्र . 4943 / 2021, दि.12.8.2021 अन्वये क्री एमए नं. 46/2021 अन्वये सीआरपीसी 156 ( 3 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. धाकराव हे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या