Saturday, April 27, 2024
Homeनगरअखेर ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी काढल्या निविदा

अखेर ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी काढल्या निविदा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खूप दिवसांपासून केवळ उत्पन्न मिळत नाही म्हणून टेंडर नूतनीकरण न केल्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेची ई लायब्ररी बंद होती.

- Advertisement -

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगराध्यक्षांना ई-लायब्ररी सुरू करण्यासंदर्भात निविदा काढाव्या लागल्या. हे उपनगराध्यक्ष ससाणे, काँग्रेस नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश असल्याचे काँग्रेस नगरसेवकांनी सांगितले.

श्रीरामपूर नगरपरिषदेची ई लायब्ररी बंद होती.

यासंदर्भात अनेक वाचकांनी व विद्यार्थ्यांनी ससाणे यांच्याकडे ई-लायब्ररी सुरू करणे संदर्भात मागणी केली होती. त्यामुळे ससाणे यांनी अचानक ई लायब्ररीला माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहानी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, जिल्हा काँग्रेसचे लक्ष्मण कुमावत, रितेश रोटे, मनोज लबडे, सुहास परदेसी, प्रवीण नवले, रितेश एडके यांच्या समवेत भेट दिली असता.

ई लायब्ररीची दयनीय अवस्था पाहावयास मिळाली. त्यामुळे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ई-लायब्ररी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वरदान असून,कमी पैशात अभ्यासाची सोय आहे परंतु नगराध्यक्षांना त्याचे काही देणे घेणे नव्हते. त्यामुळे अखेर आंदोलनाच्या इशार्‍याने पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व आपली चूक लक्षात येताच नगराध्यक्षांना ई-लायब्ररी सुरू करण्यासंदर्भात निविदा काढाव्या लागल्या.

आंदोलनाचा ईशारा देताच निविदा निघाल्यामुळे उपनगराध्यक्ष ससाणे व काँग्रेसचे नगरसेवकांचे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील वाचकांनी व विद्यार्थ्यांनी ससाणे व नगरसेवकांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या