Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेती महामंडळच्या टेंडर पध्दतीने एकलहरे शिवार हिरवेगार

शेती महामंडळच्या टेंडर पध्दतीने एकलहरे शिवार हिरवेगार

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

पडीक झालेली जमीन, संकटात आलेले महामंडळ अन् पडीक झालेल्या जमिनीचा विकास करण्याची इच्छा असेल तर विकासगंगा येऊ शकते.

- Advertisement -

याचा प्रत्यय शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या विभागाला येत आहे. त्याला निमित्त आहे, एकलहरे शिवारातील लजपतरायवाडी येथील जवळपास दोनशे चाळीस एकर शेतजमीन राज्याचे माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या अधिपत्याखाली गेल्या सहा महिन्यापासून शेती कसण्यासाठी घेतल्याने परिसर हिरवेगार होऊन आनंदाचे वातावरण पसरले दिसून येत आहे. यामुळे परिसरातील शेकडो मजुरांना चांगल्याप्रकारे रोजगार उपलब्ध झाला आहे.

सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमिनी शेतकरी कसत असल्याने तत्कालीन सरकारने हजारो हेक्टर जमिनी शेतकर्‍यांकडून काढून शेती महामंडळ या गोंडस नावाखाली त्या भाडेपट्टीवर आपल्या ताब्यात घेतल्या. पन्नास, साठ वर्षाच्या दरम्यान मध्ये शासनाने कोट्यवधी रुपये नफा मिळवला होता. या कालावधीत शेतात ऊस पिकाला अत्यंत महत्त्व देऊन राज्यातील 12 उस मळ्यालगत खाजगी व सहकारी कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा झाल्याने कारखानदार हे गब्बर झाले.

परंतु या महामंडळास हळूहळू उतरती कळा लागल्याने आर्थिकदृष्ट्या शेती महामंडळ दुर्मिळ झाले. नंतर भाडेपट्टा कराराला जास्त कालावधी लोटल्याचे लक्षात आल्याने आपल्या हक्काच्या जमिनी परत करा असा शेतकर्‍यांनी आवाज उठविला.

सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेऊन थोड्याफार जमिनी शेतकर्‍यांच्या ताब्यात दिल्या. मात्र अजूनही अजूनही शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनी पासून वंचित आहे. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाची साथ नसल्याने शेती धंदा अडचणीत सापडला व शासनाची तिजोरी खाली झाल्याने शासनाने या जमिनीकडे लक्ष केंद्रित केले. जमिनी पडीक पडल्यानंतर बर्‍याच वर्षानंतर या जमिनीकडे लक्ष घालून आता राज्यातील बहुतेक मळ्यावरील या जमिनी टेंडर पद्धतीने देऊन परिसर पुन्हा वैभवशाली करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

जवळपास शेती महामंडळाच्या सर्व वाड्या वस्तीच्या भागांतील या शेत जमिनी आता हिरवेगार दिसत असून खाजगी व्यक्तीसह सहकारातील अनेक मान्यवरांनी या जमिनी आपल्या ताब्यात टेंडर पद्धतीने घेऊन ऊस पिकासह अन्य भुसार पिके घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला लाखो रुपये खर्च करून या जमिनी कसायला सुरुवात झाली आहे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे या अत्यंत कमी वेळात येथील शेतजमिनी सुजलाम-सुफलाम करून पिके घेत आहे. त्यामुळे लगत असलेल्या शेतकर्‍यांना सुद्धा याचा निश्चितच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

या शेतजमीनीत दररोज शेकडो मजुरांना चांगला रोजगार देऊन काम करताना दिसून येत आहे. टिळकनगर स्टेट फार्मिंग वर हजारो एकर जमिनी असून यातील खंडकरी शेतकर्‍यांना थोड्या प्रमाणात जमिनी वाटप झाल्या आहे. बहुतांश जमिनी खाजगी व सहकार क्षेत्रातील अनेकांनी टेंडर पध्दतीने गेल्याने थोड्या प्रमाणात जमिनी पडीक दिसून येत आहे.

दरम्यान शेती महामंडळाने टेंडर पद्धतीची रक्कम जास्त लावल्याने छोट्या शेतकर्‍यांनी या जमिनीकडे पाठ फिरवली दिसून येत आहे. कारण जमिनी ताब्यात घेतल्यानंतर पडीक असलेल्या या जमिनींना अगोदर लाखोंचा खर्च करावयाचे असते. मात्र एवढी मोठी रक्कम या शेतकर्‍याकडे नाही म्हणून या टेंडर पद्धतीत भांडवलदारांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे.आता उर्वरित जमिनीची एकरी टेंडर रक्कम कमी व्हावी अशी मागणी आता पुढे आली आहे.

शेती महामंडळाने परिसरातील तब्बल अडीचशे एकर जमीन टेंडर पध्दतीने कसण्यासाठी दिली आहे. या जमिनीवर ऊस, कांदा, ज्वारी सह विविध पिकांसह लवकरच फळबागाही फुलणार आहे. विहिरी खोदण्यात आल्या आहे. जमीनीची सपाटीकरण झाले आहे. वैराण, पडीक जमीन फुलल्याने शेकडो शेतमजुरांना काम मिळाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या