Thursday, May 2, 2024
Homeनगरसुगाव बुद्रूक येथे दहा एकर ऊस जळाला

सुगाव बुद्रूक येथे दहा एकर ऊस जळाला

अकोले (प्रतिनिधी) –

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे आठ शेतकर्‍यांच्या उसाला लागलेल्या आगीत सुमारे 10 एकर ऊस जळल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या

- Advertisement -

सुमारास घडली. या आगीत सुमारे 400 टन उसाचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुनील गंगाधर देशमुख, संतोष नारायण देशमुख, डॉ. विराज रामनाथ शिंदे, विजय पंढरीनाथ देशमुख, पवन अशोक देशमुख, सुमनबाई घमाजी शिंदे, विलास निवृत्ती देशमुख व नितेश तान्हाजी देशमुख या शेतकर्‍यांचा ऊस सुगाव बुद्रुक येथे आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास यातील एका शेतकर्‍याच्या उसाजवळ कुणी तरी गबाळ पेटविले, त्यामुळे ऊसाला आग लागल्याचे समजते.

यामध्ये शेजारीच असलेल्या सात शेतकर्‍यांना या आगीची झळ पोहचली. भर दुपार व त्यात कडाक्याचे ऊन असल्याने आगीचे लोण शेजारच्या शेतकर्‍यांच्या उसात पसरले. आगीची तीव्रता अधिक असल्याने यात संबधित शेतकर्‍यांचे सुमारे 400 टन म्हणजेच अंदाजे 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच अगस्ति कारखान्याचा अग्नीशामक यंत्रणा घटनास्थळी पोहचली. पण तोपर्यंत बहुतांश ऊस आगीत जळून गेला होता.

कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर, शेती अधिकारी सोमनाथ देशमुख, सर्व शेतीविभाग कर्मचारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान जळालेला ऊस तातडीने घेऊन जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या