Wednesday, May 8, 2024
Homeनगररसवंतीगृहावर धडकला टेम्पो

रसवंतीगृहावर धडकला टेम्पो

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील शिवाजी चौकात असलेल्या एका रसवंतीगृहाला एका टेम्पोने

धडक दिली असून या धडकेत रसवंती गृहातील अनेक वस्तुंचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एमएच 17 टी 2448 या क्रमांकाचा टेम्पो चालकाने टेम्पो हयगयीने चालवून शहरातील शिवाजी चौक परसरातील विजय चांगदेव शिर्के यांच्या रसवंती गृहाला धडक दिली. या धडकेत रसवंती गुहाची मशिन, जनरेटर, टेबल याचे मोठे नुकसान झाले आहे. यात चालक विजय शिर्के हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विजय शिर्के यांनी फिर्याद दाखल केली असून पोेलिसांनी एमएच 17 टी 2448 या क्रमांकाचा टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. भिंगारदे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या