Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा गारठला : तापमान 10 अंशावर

जिल्हा गारठला : तापमान 10 अंशावर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तापमानाचा उच्चांक गाठणार्‍या जळगाव जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. शिवाय हवेतील आर्द्रतेचे प्रमाण देखिल कमी झाल्याने वातावरण कोेरडे आणि निरभ्र असल्याने हवेत कमालीचा गारठा वाढला आहे.

- Advertisement -

मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान 27.4 अंश तर किमान तापमान 12.2 अंश तर सोमवारी दिवसभरात 28 तर रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सीअस दरम्यान नोंदविले गेले.

ढगाळ हवामानासह हलक्या तुरकळ पावसाचा शिडकावा अशा विचित्र वातावरणाचा जळगाव जिल्हावासीय नागरीक आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते.

शहराचे वातावरणात गारठा जाणवत असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमधील शीतलहरींचा परीणाम राज्यभरासह जिल्हयात देखिल जाणवत आहे. जिल्हयातील विविध शहरांमध्ये आगामी दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा एक दोेन अंशापर्यत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असण्याची शक्यता आहे.

सोमवार सकाळी जिल्ह्यातील तालुकास्तरावर तापमान 10 ते 11अंशादरम्यान तापमानाची नोद करण्यात असल्याचे देखिल हवामान अभ्यासक वेलनेस वेदर फाऊंडेशनचे निलेश गोरे यांनी सांगितले आहे.

उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी

उबदार गुलाबी थंडी यामुळे उबदार कपड्यांच्या बहुतांश बाजारपेठात खरेदीसाठी चित्र पाहावयास मिळाले. रविवारी दिवसभर तालुकास्तरावरच नव्हेतर जिल्हयाच्या मुख्यालयी देखिल उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली होती.

तालुका – तापमान

जळगाव -10, भुसावळ -10, अमळनेर – 10, बोदवड – 11, भडगाव – 11, चोपडा – 11, चाळीसगाव – 10, धरणगाव – 11, एरंडोल – 11, फैजपूर – 11, जामनेर – 11, मुक्ताईनगर – 11, पारोळा – 11, पाचोरा – 11, सावदा – 11, वरणगाव – 12, यावल – 11

- Advertisment -

ताज्या बातम्या